युनेस्कोच्या एका अभ्यासानुसार दरवर्षी कित्येक 'भाषा कायमच्या नष्ट होत आहेत. भाषांचं नष्ट होणे मानवी संस्कृतीच्या महत्वाच्या दस्ताऐवजाचं कालबाह्य होण्यासारखं आहे. मग अशा वेळी आपली मातृभाषा जपणं, ती वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे हे आम्ही आपलं कर्तव्य समजतो. यातुनच आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांतुन मराठी भाषा दिन साजरा करतो. मराठी ग
युनेस्कोच्या एका अभ्यासानुसार दरवर्षी कित्येक 'भाषा कायमच्या नष्ट होत आहेत. भाषांचं नष्ट होणे मानवी संस्कृतीच्या महत्वाच्या दस्ताऐवजाचं कालबाह्य होण्यासारखं आहे. मग अशा वेळी आपली मातृभाषा जपणं, ती वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणे हे आम्ही आपलं कर्तव्य समजतो. यातुनच आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांतुन मराठी भाषा दिन साजरा करतो. मराठी ग्रंथ दिंडी, मराठी भाषा प्रतिज्ञा, मराठी स्वाक्षरी मोहीम, शालेय कथा अभिवाचन स्पर्धा, राज्यव्यापी हस्ताक्षर स्पर्धा, राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा या आणि अश्या अनेक उपक्रमांतून आमचा भाषेचा जागर सुरूच असतो!
शिक्षणाअभावी किंवा अर्धवट शिक्षण सोडायला लागणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या प्रचंड आहे. त्यांची शाळा सोडण्याची कारणे फार वेगवेगळी आहेत.
कित्येकदा काही क्षुल्लक कारणांसाठी किंवा अगदी थोड्या पैशांसाठी मुलांचे शिक्षण सुटते जे थांबवले जाऊ शकते. “पारिजात मुंबई " आपल्या परिने याच प्रश्नाला उत्तर शोधतेय. आदिवासी आणि सामाजिक दृष्टया मागास विद्यार्
शिक्षणाअभावी किंवा अर्धवट शिक्षण सोडायला लागणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या प्रचंड आहे. त्यांची शाळा सोडण्याची कारणे फार वेगवेगळी आहेत.
कित्येकदा काही क्षुल्लक कारणांसाठी किंवा अगदी थोड्या पैशांसाठी मुलांचे शिक्षण सुटते जे थांबवले जाऊ शकते. “पारिजात मुंबई " आपल्या परिने याच प्रश्नाला उत्तर शोधतेय. आदिवासी आणि सामाजिक दृष्टया मागास विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू, शिवाय मागास विभागातल्या शाळांचं सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरु केलाय. या माध्यमातून पारिजात मुंबई महाराष्ट्र राज्यातील 17 जिल्ह्यातील जवळपास 110 शाळा आणि जवळपास 15000 विद्यार्थ्यापर्यंत पोहचले आहे. उद्याच्या भारताचा आधारस्तंभ असणाऱ्या या विदयार्थ्यांना अभ्यासाकडे पुन्हा नेण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न अविरत सुरू आहे.
जीवनातल्या सर्व अंधाराला अडचणींना मागे सारून नव्याने येणाऱ्या आयुष्याला सामोरे जाण्याचा हा सण. आम्ही साजरी करतो दिवाळी, अगदी जोशात, जल्लोषात, अशा लोकांसोबत ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे प्रकाशाच्या प्रेरणेची. दिवाळीचा आनंद अनाथ मुलांसोबत किंवा एकाकी वृद्धांसोबत वाटून त्यातून मिळणारं समाधान हे आमची दिवाळी अधिक प्रकाशमान करतं.
याच भावनेतून
जीवनातल्या सर्व अंधाराला अडचणींना मागे सारून नव्याने येणाऱ्या आयुष्याला सामोरे जाण्याचा हा सण. आम्ही साजरी करतो दिवाळी, अगदी जोशात, जल्लोषात, अशा लोकांसोबत ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे प्रकाशाच्या प्रेरणेची. दिवाळीचा आनंद अनाथ मुलांसोबत किंवा एकाकी वृद्धांसोबत वाटून त्यातून मिळणारं समाधान हे आमची दिवाळी अधिक प्रकाशमान करतं.
याच भावनेतून गेली काही वर्षे सातत्याने आम्ही वेगवेगळ्या अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रम यांना आर्थिक आणि इतर मदत करत आहोत.
ज्या समाजात कलांना महत्व आहे तो समाज नेहमीच सजग आणि रसिक असतो आणि कुठल्याही कलेला पाठबळ देणं हि पुढारलेल्या समाजाची जबाबदारी आहे. हिंदुस्थानात रंगभूमीला फार मोठा इतिहास आहे. मोठमोठ्या नाटककारांनी भारताचे नाव रंगभूमीच्या माध्यमातून जगभर नेले आहे. आम्ही दरवर्षी रंगभूमी दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. एका ज्येष्ठ रंगकर्मीचा यथोचित सत
ज्या समाजात कलांना महत्व आहे तो समाज नेहमीच सजग आणि रसिक असतो आणि कुठल्याही कलेला पाठबळ देणं हि पुढारलेल्या समाजाची जबाबदारी आहे. हिंदुस्थानात रंगभूमीला फार मोठा इतिहास आहे. मोठमोठ्या नाटककारांनी भारताचे नाव रंगभूमीच्या माध्यमातून जगभर नेले आहे. आम्ही दरवर्षी रंगभूमी दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. एका ज्येष्ठ रंगकर्मीचा यथोचित सत्कार करून आम्ही त्यांना मानवंदना देतो.
पारिजात मुंबई च्या "रंगभूमी सेवा पुरस्कार" चे आज पर्यंतचे मानकरी...
कै. सुहास भालेकर (ज्येष्ठ रंगकर्मी)
श्री. दादा परसनाईक (ज्येष्ठ नाट्य संगीतकार )
श्री. जयंत सावरकर (अभिनेते)
कै. कमल शेडगे (सुलेखनकार,नाट्य जाहिरातकार )
श्री. सतीश पुळेकर (अभिनेते,दिग्दर्शक)
श्री. अतुल पेठे (अभिनेते,दिग्दर्शक)
श्री. ओमप्रकाश चव्हाण (दशावतारी कलाकार)
कै. किशोर प्रधान (ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार)
कै. जयंत पवार (समीक्षक, लेखक)
श्री दत्ता भाटकर (ज्येष्ठ रंगभूषाकार)
गेल्या काही वर्षात प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात येतेय. आमची ग्रीन गँग आक्रमक आणि अभिनव पद्धतीने वृक्षाच्या मुळाशी उठलेल्या सगळ्या वाईट प्रवृत्तींशी लढा देण्यास सज्ज आहे. झाडांसंबंधीची जनजागरूकता वाढवणे, सरकारी यंत्रणेत झाडांसंदर्भात पाठपुरावा करणे, झाडांची लागवड व संरक्षण हाच आमचा ध्यास आहे. आजपर्यंत अनेक शाळांच्या माध्यमातून आपण गावागावात शेकडो झाडे लावली आहेत.
जिल्हा परिषद शाळा निधी अभावी अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये शिकण्याचा उत्साह नाही.
ह्या उपक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या विनंती पत्रानुसार शाळेतील वर्गखोल्या, व्हरांडा, रंगमंच, संरक्षक भिंत यावर शैक्षणिक व विविध माहितीपर चित्रे काढून रंगरंगोटी करण्यात येते. पोषक वातावरण तयार केले जाते.
सदर उपक्रमात लाभार्थी शाळा खालीलप्रमाणे
जिल्हा परिषद शाळा निधी अभावी अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये शिकण्याचा उत्साह नाही.
ह्या उपक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या विनंती पत्रानुसार शाळेतील वर्गखोल्या, व्हरांडा, रंगमंच, संरक्षक भिंत यावर शैक्षणिक व विविध माहितीपर चित्रे काढून रंगरंगोटी करण्यात येते. पोषक वातावरण तयार केले जाते.
सदर उपक्रमात लाभार्थी शाळा खालीलप्रमाणे :-
१) जिल्हा परिषद शाळा आंबिवली, वाशिंद, ता. शहापुर, जि. ठाणे
२) जिल्हा परिषद शाळा लतीफवाडी, कसारा, ता. शहापुर, जि. ठाणे
३) जिल्हा परिषद शाळा शेरे, वाशिंद, ता. शहापुर, जि. ठाणे
४) संत गाडगे महाराज आश्रमशाळा, दाभोण, ता. डहाणू, जि. पालघर
५) जिल्हा परिषद शाळा साखरवाडी (शेई), ता. शहापुर, जि. ठाणे
६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभिवली, ता. हवेली, जि. पुणे
७) जिल्हा परिषद शाळा वांजळे, ता. मुरबाड, जि. ठाणे
८) जिल्हा परिषद शाळा भोईरवाडी, ता. कर्जत, जि. रायगड
९) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवई नं. ३, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
१०) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे
११) सोपारा इंग्लिश स्कूल, सोपारा, ता. वसई, जि. पालघर
१२) जिल्हा परिषद शाळा कोळगाव, ता. अलिबाग, जि. रायगड
१३) जिल्हा परिषद शाळा काचरपाडा – अ, ता. विक्रमगड, जि. पालघर
१४) द ग तटकरे माध्यमिक विद्यालय, भाळगाव, ता. रोहा, जि. रायगड
१५) जिल्हा परिषद शाळा भाळगाव, ता. रोहा, जि. रायगड
१६) जिल्हा परिषद शाळा मळवंडी ढोरे, ता. मावळ, जि. पुणे
१७) जिल्हा परिषद शाळा बुदरुल, ता. अंबरनाथ, जि. ठाणे
१८) भाऊसाहेब लोकेगावकर विद्यालय गिर्ये, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
१९) जिल्हा परिषद शाळा गासकोपरी (विरार), ता. वसई, जि. पालघर
पारिजात मुंबई ग्रामीण भागातल्या शिक्षणा साठी विविध प्रकारे कार्यरत आहे. आपले काम केवळ वस्तू वाटप या स्वरूपात न ठेवता ग्रामीण भागातल्या गरजू विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळून स्वतःच्या पायावर कसे उभे करता येईल या विचारातून जन्म झाला "शिक्षण आधार योजना" या संकल्पनेचा !
ग्रामीण भागातल्या हुशार आणि शिकू पाहणाऱ्या विद्यार्थांना वर्षभर हवी ती श
पारिजात मुंबई ग्रामीण भागातल्या शिक्षणा साठी विविध प्रकारे कार्यरत आहे. आपले काम केवळ वस्तू वाटप या स्वरूपात न ठेवता ग्रामीण भागातल्या गरजू विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळून स्वतःच्या पायावर कसे उभे करता येईल या विचारातून जन्म झाला "शिक्षण आधार योजना" या संकल्पनेचा !
ग्रामीण भागातल्या हुशार आणि शिकू पाहणाऱ्या विद्यार्थांना वर्षभर हवी ती शैक्षणिक मदत करून आधार देण्यासाठी त्यांचा इयत्ता १२ वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलण्यासाठी त्यांना दत्तक घेतले जाते. आतापर्यंत या उपक्रमात दत्तक घेतलेले काही विद्यार्थी
जयश्री तारमाळे, वाशिंद, ठाणे
निकिता मोरे, वाशिंद, ठाणे
यज्ञेश तारमाळे, वाशिंद, ठाणे
तनिष्का विनोद गायकवाड, दौंड पुणे
तेजू विनोद गायकवाड, दौंड, पुणे
साजिद शेख, मुंबई
रसिका जनार्दन रकते, रोहा, रायगड
पारिजात मुंबई त्यांच्या पुढील शिक्षणासाठी देखील कटिबध्द आहे.
पारिजात मुंबईने २०१९ वर्षापासून ‘बॅक टू स्कूल’ अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण, मागास, दुर्गम आणि आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य विकास कार्यशाळा या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे.
या कार्यशाळेत विविध विषय हाताळले जात असून विविध क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. आमच्या या उल्लेखनी
पारिजात मुंबईने २०१९ वर्षापासून ‘बॅक टू स्कूल’ अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण, मागास, दुर्गम आणि आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य विकास कार्यशाळा या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे.
या कार्यशाळेत विविध विषय हाताळले जात असून विविध क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. आमच्या या उल्लेखनीय उपक्रमात साथ देण्यास अनेक तज्ञ मंडळी पुढे सरसावली आहे.
सौ. अस्मिता ठोसर देसाई, (ताज हॉटेल), विषय - आपली देहबोली, सौंदर्य आणि स्वच्छ्ता
सौ. चित्रा नानिवडेकर (नर्सिंग सिस्टर), विषय - वैयक्तिक स्वच्छता, आजारातील आणि आहारातील अंधश्रद्धा, प्रथमोपचार तसेच करिअरची दिशा
श्री. प्रकाश गुंजाळ, विषय - दहावी बोर्डाच्या परिक्षेची पूर्वतयारी आणि परीक्षेत गुण कसे वाढवावे.
सौ. निकिता तिवारी, विषय - लैंगिक शिक्षण (Good-Bad Touch)
श्री. सुनील परतोले सर (शिक्षक), विषय - भौमितिक संकल्पना
वरील सर्व कार्यशाळा शहापुर तालुक्यातील वाशिंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेई आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, शेई येथे घेण्यात आल्या.
Copyright © 2008 Parijat Mumbai - All Rights Reserved.
Design & Developed by EliteExtant
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.