डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर तालुक्यातील कलमपाडा ह्या आदिवासी पाड्यावरील लहान मुले, स्त्रिया आणि तेथील पुरुषांसाठी एक दिवसीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. एकूण ८० लोक सहभागी झाले होते.
आपण बॅक टू स्कुल अंतर्गत गेले ५ वर्षे ग्रामीण भागातील अनेक शाळांचा विकास विविध पद्धतीने करण्याचा निर्धार केला आहे. पारिजात मुंबई च्या प्रयत्नाने शहापूर येथील जिल्हा परिषद शाळा कलमपाडा आणि आंबिवली ह्या शाळेत कॉम्प्युटर टेबल, स्कूल बॅग रॅक (लॉकर), खेळाचे साहित्य, प्रयोगशाळा, कलादालन, कलामंच आणि वाचनालय उभारणीसाठी मे. बर्न्स आणि मॅकडोनेल इंजिनियरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. लार्सन अँड टुब्रो लि. (एल अँड टी) या कंपनींकडून मोठा निधी देऊन शाळेच्या विकासासाठी हातभार लावलेला आहे.
पारिजात मुंबई च्या प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळा, फळेगाव, ता. कल्याण, जि. ठाणे या शाळेत ICICI Lombard च्या मार्फत डोळे तपासणी शिबीर तसेच आवश्यक गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले.
एकूण १०९ मुलांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली.
ग्रामीण भागातील गरजू, महत्त्वाकांक्षी आणि शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आमचा ध्यास आहे. त्याचीच सुरुवात म्हणून दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आय आय टी, पवई येथील आंतररष्ट्रीय दर्जाचे टेक फेस्ट ची सहल आयोजित करण्यात येते.
कोरोनामुळे समाजावर ओढवलेल्या बिकट परिस्थितीतून आता आपण काहीसे स्थिरावतोय. याकाळात कित्येकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले, उद्योगधंदे, रोजगार या सगळ्यात नुकसान सोसावे लागले. या कठीण काळात काही मंडळी आणि संस्था ध्येर्याने उभ्या राहिलेल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नांना पारिजात परिवाराकडून छोटासा हातभार म्हणून आपण त्यांना आर्थिक मदतीचा हातभार लावला होता. या त्या संस्था
सह्याद्री इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (SERT)
छात्र-शक्ती संस्था, कल्याण
माणुसकी फाऊंडेशन, कोल्हापूर
भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, बीड (शांतीवन)
ए-वन बाल मित्र मंडळ पुरस्कृत पारिजात मुंबई यांच्या सहकार्याने शालेय व महाविद्यालयीन वि्यार्थ्यांसाठी मोफत चित्रकला प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.
Copyright © 2008 Parijat Mumbai - All Rights Reserved.
Design & Developed by EliteExtant
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.