पारिजात नावाच्या रोपटयाचा प्रवास म्हणजे चांगलं काही घडवायच्या जिद्दीने एकत्र आलेली तरुण मंडळी आणि पारिजातचा आजचा हा मोठा परिवार....
खरंतर आजपर्यंतचा प्रवास सुखावणारा आहे, पण प्रवासातील प्रत्येक वळणावर मैलाचा दगड लागतो आणि हा दगड ध्येयासाठी किती पल्ला गाठायचा आहे ते दर्शवितो याप्रमाणेच आम्ही 'सुगंध जगण्यातला' हे आमचं ब्रिदवाक्य मनाशी पक्कं करून मार्गक्रमण करतोय.
तसं पाहता अन्न, वस्त्र, निवारा (किंवा सध्या मोबाईल) या जशा माणसाच्या मुलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे जगण्यासाठी एक चांगला समाज हि सुद्धा तितकीच महत्वाची आणि निकडीची गरज आहे. आणि येणाऱ्या भविष्यासाठी असा आदर्श समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही तुमची आमची किंबहुना आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. पारिजात मुंबई स्थापनेपासून याच ध्येयाप्रत काम करतेय , तेव्हा तुम्हीही सामील व्हा... सोबत येऊया... सुगंध पसरवुया.... बदल घडवुया.....
कुणीतरी म्हटलंच आहे,
कैसे आसमान में सुराक नहीं हो सकता,
एक पत्थर तो तबियत से उछालो यारों!
Copyright © 2008 Parijat Mumbai - All Rights Reserved.
Design & Developed by EliteExtant
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.